STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

आस

आस

1 min
222

नयनांचे पापणीअडून

हलकेच तुला बघते रे

मिश्किल तव हावभावांचे

पूल मनी बांधते रे ....।।१।।


तव शैशव बोल बोबडे

ऐकूनी मनी उठती तरंग रे

कृष्णासम राजस वेड्या

तव अलिंगनास बाहू झुरती रे....।।२।।


तव दुडूदुडू धावण्याने

उरी स्पंदने दाटती रे

तव मृदूल स्पर्शास

आचवती मम बाहूंचे हार रे....।।३।।


तव खोडील बाललिलांचे

नयनरम्य आभास रे

तुजसाठी झुरतो जीव

मनी भेटीची आस रे....।।४।।


कधी भेटसी तू मम लाडक्या

लपंडाव हा सांड रे

गळा गुंफुनी कोमल करपाश

मम प्रतिसादास देई तू साद रे....।।५।।


ही आस मम वेडीची

पूरव तू खास रे

पुरे हा विरह लडीवाळा

तव भेटीस्तव आचवले प्राण रे....।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics