STORYMIRROR

Anju Metkar

Romance

3  

Anju Metkar

Romance

तुजवीण

तुजवीण

1 min
203

दीसताच तू सामोरी

मूक होती बोल

कसे सांगू सखे तुला

प्रेमाची भाषाच असे अबोल...।।१।।


तव नयन गहीरे बोलके

न बोलूनही बोलतात शेलके

माझ्या उरी नित्य हेलकावे

धडपड ,हुरहूर ह्रदयात पालवे ....।।२।।


वाटे कधी ओळख नवखी

कधी भासे युगांतरीचे सोबती

दरवेळी नव्यानेच भेटते तू सखी

कुठल्या ऋणानुबंधाची ही मोहक नाती...।।३।।


तव अस्तित्वे आस बहरते

तुझ्याच सहवासे मी नित्य मोहरतो

तुझ्या असण्यातच मी पण विसरतो

तुजविण मी असून झुरतो.....।।४।।


जागवल्या किती रात्री अन् प्रहर

दिवास्वप्नावर तुझीच मोहोर

मिटल्या नयनावर तूच स्वार

तुझे भेटणे जणू प्राचीवर उजागर ....।।५।।


तव भेटीस्तव आतुर हे मन

दिनरात मनी तुझेच चिंतन

आर्त विव्हल मन ओथंबून

तुझ्या सहवासाचे मागते गोंदण...।। ६।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance