STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

शब्दरागिणी

शब्दरागिणी

1 min
209

त्या कदंबवृक्षाखाली

त्या यमुनातटाजवळी

ती अधोवदना बैसली

राधा सखी श्रृंगारलेली ।।१।।


तो चितचोर मुरलीवाला

वाजवतसे पावा मंतरलेला

आलापींनी तो सजलेला

जणू लक्ष अमृतधारा बरसलेला ।।२।।


हरखून ती बाला

न्याहळे तयाच्या लीला

सभोवतालचे भान नसे तिला

रंगी रंगली ती भुलली गिरिधरलीला ।।३।।


गोपगोपिकांच्या चमूतला

तो पीतांबरधारी राजस बासुरीवाला

मोरपीस शिरी खोवलेला

कृष्णसखा समीप उभारलेला ।।४।।


ती बावरली लाजून चूर जहाली

गौरगाली लालिमा ल्याली

 तयाचे रुप साठवे ती अधीरतेने पापणीखाली

सावळबाधेची जणू प्रचिती आली ।।५।।


तो श्यामसुंदर प्राणसखा

श्वासात भिनला श्वास जसा

भिन्न शरिरी एक प्राण निका

युगांतरीचे गुज सांगती एकमेका ।।६।।


ही कथा प्रेमकहाणी

कि असे प्रेमविरहीणी

दोन लुब्ध जीवांची कहाणी

न फुलताच उमललेली ती शब्दरागिणी ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics