STORYMIRROR

Umakant Kale

Classics

4  

Umakant Kale

Classics

राजे शिवाजी

राजे शिवाजी

1 min
522

शिव शंभू, शिव शंभू, राजे शिवाजी शिव शंभू

रुद्र होऊन गर्जती, महाराष्ट्र देश बोले, शिव शंभू।।धृ।।


कण कण माती झाली आग

स्वराज्यात जन्मला वाघ

घेऊनी स्वप्ने आईचे उरी

घडविले शिवाजी जिजाऊने जरी...

घ्यायचे तांडव रुप तुला... शिव शंभू..

शिव शंभू, शिव शंभू, राजे शिवाजी शिव शंभू..

रुद्र होऊन गर्जती, महाराष्ट्र देश बोले, शिव शंभू।।१।।


हाहाकार अन्यायाची लढे

मराठे सरदार होती पुढे 

बाल शिवाजीनी मनी हेरले

स्वराज्याची चालली पाऊले..

तलवारी आता हरहर बोले.. शिव शंभू

शिव शंभू, शिव शंभू, राजे शिवाजी शिव शंभू

रुद्र होऊन गर्जती, महाराष्ट्र देश बोले, शिव शंभू।।२।।


आई बहिणीची अब्रू वेशी

नाही होते तारण्यास देशी

जात पातीचे कुंपण तोडीले

रयतेचे राज्य हो आणिले

परस्त्री मानली माता.. जणू आले शिव शंभू

शिव शंभू, शिव शंभू, राजे शिवाजी शिव शंभू

रुद्र होऊन गर्जती, महाराष्ट्र देश बोले, शिव शंभू।।३।।


युग पुरुष, न्याय सिंहासनी राजा

दूरदृष्टी जणू शिव त्रिनेत्र साजा..

सह्याद्रीच्या कुशीत सुसाट वारा

महाराष्ट्रात वाहे समतेची धारा...

शिवछत्रपती जाणता राजा.. सदा मनी शिव शंभू

शिव शंभू, शिव शंभू, राजे शिवाजी शिव शंभू.

रुद्र होऊन गर्जती, महाराष्ट्र देश बोले, शिव शंभू।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics