STORYMIRROR

Umakant Kale

Others

3  

Umakant Kale

Others

स्मशान

स्मशान

1 min
209

कधी कुठे नदीकाठी

तर कधी गावापासून दूर

एकांतात माझं स्थान

म्हणजे "स्मशान भूमी"

प्रत्येक माणसाचा

आखरी गंतव्य

पंचतत्वात विलीन

होताना मी कित्येकदा

स्तब्ध होऊन

राजा किंवा रंक पाहिले...

आयुष्यभर जो आपल्याच

घमंडात जगत आला

उच्च निच्च भेद पाळत आला..

पण माझ्या कडे येताना

कुठे भेद उरतो...

पैसेवाला असला तरी

जमीनीवर झोपवलेला असतो...

एक चादर ओढून पडलेला

त्याच वैभव त्याच नाव

सगळं येथे माग पडतं..

सोपं नसतं असं बघणे

एखाद्या योगी प्रमाणे

निराकार निर्गुण

स्वतः ला ठेवून

युगायुग चालत आलो आहे.

जेव्हा खाली यायचे

खाली जायचे

मग उगाच का भ्रमात

जगायचे...


Rate this content
Log in