STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

प्रेरित

प्रेरित

1 min
418

आयुष्यात प्रेरित व्हायला

नाही आपला देश 

पारतंत्र्यात होता ..

नाही असे मोठे व्यक्तीमत्व

मला भुरळ घालू शकले होते..

पण एके दिवशी शाळेत

विर्दभातील बहुचर्चीत

व्यक्तीमत्व समोर आले.....


क्षणार्धात प्रभाव सोडून गेले

विठ्ठल वाघ साहित्यात

कोणी सहज परिचित असेल ते नाव..

त्याच्या साध्यासुध्या शैलीत

शब्दाचा खेळ मी पाहीला....


टाळ्यांचा तो कडकडाट

ऐकला मग जे विचारले

बघा किती सोपे असते

कविता करणे.. रचनं

मग तुम्ही करताना प्रयत्न

मग बालमन प्रेरित होऊन गेले....


कागदावर शब्द उतरवून गेले..

छंद दिवसेंदिवस वाढतच गेला..

अनेक साथी 

अनेक मार्गदर्शक मिळाले..

सज्ज झाला कवी..

उमाकांत चा कवी उमाकांत झाला

कवी उमाकांत झाला...


Rate this content
Log in