STORYMIRROR

Umakant Kale

Romance Others

3  

Umakant Kale

Romance Others

मनाची पडझड

मनाची पडझड

1 min
294

हल्ली खूप भिती वाटते

तुझ्याशी बोलताना

बऱ्यादा तू लपवलेले

तुझ्या मनातील

जखमा जेव्हा मी वाचतो

तेव्हा मला वाटते

का रे देवा ! उगाच मला जाणीव दिली.

कुणाच्या मनात शिरूर

ते वाचण्याची.

कुठतरी माझ्यातला कर्ण जागून

तुला त्यातून काढून मुक्त करावं

अण् सुखाचा दान द्यावं..!

असे नेहमीच वाटते मला..

पण तुझ्या स्वाभिमान जपावा वाटतो

माहिती आहे मला 

तुझं स्वतः असं वलय आहे.

तू गुंफलेला तुझ्या नात्याचा खोपा,

त्यात तुझी पिल्ले ज्याच्यासाठी

तू उरलेले आयुष्य खर्ची करणार...

तुझे मन वाचले हे जाणून

थोडे तू मला दूर करते आहे

हे ही मी बराच वेळा जाणले...

तू पती गेल्यावर तुटली नाही,

नाही कधी तू हरली.

तू सर्मथपणे विरंगणाहून

राणी लक्ष्मीबाई सारखी लढत राहली..

म्हणून तुझाचा सन्मान वाटतो.

तुझ्यातील तुझ्या चांगल्या गोष्टी

ज्या मला नेहमीच 

तुझ्या प्रेमात पाडत आल्या आहेत.

पण तुझ्यावर कधी मला रुसवा नाही

नाही मी माझ्या प्रेमाचा हक्क गाजवायचा..

नाही तुला ते मान्य करावे लागेल

फक्त ऐवढेच सांगून जा...

हो आहे माझ्या ही मनात

तुझी जागा...बस्स ऐवढेच पुरेसे !

जगण्यासाठी...

राधेची प्रेमाची प्रित मी ही जपेल

मिराच्या भक्तीत जसे सर्मपण होते

तसेच मी करेल फक्त दूरुनच

फक्त मला मन वाचायला

तेवढी परवानगी देत जा...

तुझं दु:ख काहीस 

वाटायला...

तुझ्या मनाच्या नदीच्या काठावर

बसायला... फक्त तुझा व्हायला..।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance