STORYMIRROR

Umakant Kale

Inspirational

3  

Umakant Kale

Inspirational

ती मर्दानी

ती मर्दानी

1 min
277


ऐका सांगतो काहणी

येई डोळ्यात हो पाणी

नार अशी थोर येथे

किती गाऊ तिची गाणी..


नाळ गरीबीची दारी

कष्ट हो देई भाकरी..

अंगी चिंध्या चिंध्या

नाही हारली ती खरी..


सौभाग्याचे देण होते

टिळा कुंकूम कपाळी..

हाती रेषा कमी जरी

नाही भासे हो पोकळी...


अचानक देव ही रे

कसा काय तो कोपला

धनी तिचा मग असा

कोण्या रोगाने घेरला..


सैरभैर अशी झाली

पैसा कुठे होता घरी

करी विनवणी जगी

कोणी वाचवा हो जरी..


नाही आले कामी येथे

दाम बोले, नाव छोटे 

मग आश्चर्य घडले

तिने हो एकले कुठे !


दौंड धावण्याची होती

बक्षीसही रक्कमीची

वय साठीची हो गड्या

वेळ झाली धावण्याची...


जीवनात मँरेथाँन

पायी अनवाणी होती

काय सांगू ती मर्दानी

सगळ्याच्या मधे होती..


अशी धावली या जगी

आली जिंकूनी ती पुढी

वाचवून नवऱ्याला

केली यशाची हो गुढी


करतो हा उमा सलाम

झिजवूनी ही लेखनी

नारी तुझ्याविना जग

सुन्या सुन्या भासे क्षणी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational