आयुष्यावर बोलताना
आयुष्यावर बोलताना
आयुष्यावर बोलताना
थकलो रे आज आम्ही
सुकले अंगावरचे रक्त
शेवटी कुजत आलं यौवन ही....
फाटलेल्या कपड्या पासून
घासलेल्या आमच्या चप्पलांनपर....
गोठवलेल्या सुखापासून
गाळलेल्या घामापर्यंत
न दिसलेल्या खचता पर्यत...!
आम्ही संगतीने लढत राहिलो....
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक
ऊन पावसाळ्यात
बदलणाऱ्या चढ उतरात
आम्ही आमचं आयुष्यचं
लेकरान साठी वेचत आलो होतो...
कदाचित मिळणाऱ्या खचता
त्यातून निर्माण होणाऱ्या वेदना
आम्ही भविष्यात यातून
सुखी होण्याच्या अपेक्षा करत होतो...!
पण या कलयुगात वनवासाची
खरे किती वर्षे आहे ?
प्रभू श्रीरामाला ही माहिती नसावा...?
कुठे मुले मायबापांना
वृद्धाश्रमात पाठवून कर्तृत्व पार पाडतात...
तर कुठे मुले शिक्षणासाठी परदेशात जाऊन
नोकरी, लग्न तेथेच करुन
तिकडचे होऊन जातात
ना मायबापाला समजते...कुणा कुणाला !
नंतर उरतो फक्त आमच्या वृद्धांनचा
परतीचा प्रवास....
सांगायला फक्त अनुभवाची शिदोरी
नाही कुणाच्या ती उपयोगाची
नाही कुठल्या मोलाची
