स्मशान
स्मशान
एके दिवशी पहाटे
नाही कुठे असणार ...
श्वास माझा येथे
नाही मग उरणार...
नको धरू रुसवा तू
कधी काळी बोलण्याचा
असणार गड्या शत्रू
बघ मी तरी कुणाचा..
आहे शांत बसून मी
नाही तुम्हाला दिसेल
डोळे माझे बोलतील
नाही शब्द ते दिसेल...
ताई नको रागवू गं
रक्षाबंधनाच्या दिनीं
भाऊ नसला तरीही
असणार आठवणी..
घर माझे सुने लागे
जिथं घडल्या कविता
शब्द होते सोबतीला
सुख दुःखी ते धावता
आठवत नाही मला
किती होतेस सोयरे
नाड जोडूनी शब्दास
झाले सख्खे हे सोयरे...
आज त्या सरणावरी
अखेरीस पोहचला
व्यक्त होऊन उत्कृष्ट
कवी मनास भिडला...
नको लाकडे सरणी
ठेवा शब्दाची व्युत्पत्ती
भावरुपी अग्नीदाह
मिळो अशी अनुमती