पुस्तक
पुस्तक
अरे माणसा जर
दोस्ती करशील पुस्तकाशी
तर सद्विचार येतील
तुझ्या मस्तकाशी
अनेक महामानवांनी
आपल्याला सांगून ठेवले
पुस्तकांशिवाय आयुष्य
आपले आहे अर्धमेले
महात्म्यांच्या जयंत्या
नको साजऱ्या करू नाचून
त्यांचे क्रांतिकारी विचार
बघ जरा पुस्तकात वाचून
तुकाराम , बुद्ध,गांधी
शिवाजी, बाबासाहेब
अ
शा कित्येक पिढ्या
या पुस्तकानेच घडवल्या
पुस्तक म्हणजे आहे
हा एक ज्ञानाचा दिवा
घेशील या पुस्तकाचा प्रकाश
तर करशील समाजाची सेवा
वाचशील तू जर
हे अमृतरूपी पुस्तक
तर नक्कीच साफ होईल
विषारी विचारांचे तुझे मस्तक
म्हणून म्हणतो पुस्तक
एकदा चाळून तर बघ
पुस्तकाने तुझे अंधारमय
आयुष्य प्रकाशेल बघ