STORYMIRROR

Eshawar Mate

Inspirational

2.3  

Eshawar Mate

Inspirational

संकटांना बोलवा रे

संकटांना बोलवा रे

1 min
26.8K


ध्येय माझेही यशाचे,

संकटांच्या पार आहे।

संकटांना बोलवा रे, 

मीच त्यांचा यार आहे।।

रक्त माझे इंकलाबी 

शिवबांचा वार आहे।

हात पापी कंटकाचे,

 छाटणारी धार आहे।।

राबणारा हात माझा 

जीवनाचा सार आहे।।

 ध्येयवादी माणसांना, 

जोडणारी तार आहे।।

प्रेरणेची साथ मोठी

आज मी यल्गार आहे।

उंच आकाशी भयाला, 

मारणारी घार आहे।।

ऐतखाऊ माणसांचा 

जगालाही भार आहे।

राबणारे थोर पण

आज त्यांची हार आहे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational