नजर हटेना
नजर हटेना
गजऱ्यात मोगऱ्याच्या, फसली नजर हटेना।
त्या चेहऱ्यात जादू कसली नजर हटेना।।...
डोळेच बोलले ते माझ्या मुक्या मनाशी
डोळ्यात देह बोली ठसली नजर हटेना।।...
भेटायला तिला मी बोलावताच आली
चंद्रा समान मुखडा असली नजर हटेना।।...
प्रेमातल्या सुखाची, फुलबाग ती सुगंधी
खिडकीत आठवांच्या हसली नजर हटेना।।...
कविता तिच्या रुपावर,चौकात मीच गातो
कप्प्यात ती मनाच्या,वसली नजर हटेना।।...
पाडून भूल मजला स्वप्नात नाचताना
हृदयामधेच माझ्या धसली नजर हटेना।।...
ती आग लावते पण, विझवत कधीच नाही
दातात ओठ दाबत, डसली नजर हटेना।।...

