गारवा
गारवा
क्षण आज आठवले
गुलाबी थंडीतले-
तु मला अन मी तुला
नजरेने पाहिले ।।
भुरळ घालून मजला
जिंकलेस त्या क्षणी-
रूप तुझे मोहक
राहिले माझ्या मनी।।
पुनः नव्याने भेटीची
ओढ लागली आहे-
गारवा ही माझ्यासावे
वाट पाहतो आहे।।
ओढीने तुझ्या शहारले
चांद्रमाला न्याहाळले-
तो ही पाहत असेल याला
आठवत असेल का मला?
कावरीबावरी
झाले मी क्षणात-
विचारांचे काहूर
माजले मनात।।
वचन तु दिले ते
क्षणभंगुर नाही-
विश्वासाने मन माझे
तुझी वाट पाही।।

