स्पर्श
स्पर्श
नऊ मास नऊ दिन
गर्भात बीज अंकुरले..
यातना अनंत सोसल्या
बाळ गोजिरे जन्मले।।
स्पर्श त्याचा कोमल
पहिल्यांदा अनुभवले...
नाजूक हात पाहून
मातृत्व माझे हर्षले ।।
मऊ मऊ गाल त्याचे
मुलायम त्याची काया...
आकर्षले तृप्ततेने
पाझरली माझी माया।।
स्पर्श बाळाचा पहिला
आई विसरत नाही...
झाले कितीही मोठे
लेकरू म्हणूनच पाही।।
वात्सल्य आईचे ते
असते अति कोमल...
तिच्यासाठी तान्हुला
बाळ बहू अनमोल।।
ममतेचा नित्य करावे
आदर, सन्मान ....
भावनांना तिच्या असावे
हृदयात नेहमी स्थान ।।