भ्रमंती
भ्रमंती

1 min

344
गगन भरारी घेऊ आकाशात,
उंच उंच नभाशी जाऊ,
स्पर्धा करूया पक्षाबरोबर,
घार बनुनी सुसाट येऊ.।।१।।
तंत्रज्ञानाचा युग आले,
विमानातून विहार करावे,
उंच उंच क्षितिजावर जावे,
आनंद लहरी मध्ये उंच फिरावे.।।२।।
तोडून आणू आकाशातील तारे,
सुर्यमालिका भोवती फिरावे,
एकन एक तारे मोजावे,
आकाशात उंच झोका घ्यावे.।।३।।
ईच्छा होती आई वडिलांची,
एकदा तरी आकाशी उडावे,
भ्रमण करावे आकाशलोकात,
यांत्रिक पक्षी बनून मुक्त संचार करावे.।।५।।