कवितेचा जन्म कुठे होतो ?
कवितेचा जन्म कुठे होतो ?


कविता ही जिवंत झरा आहे,
कविता अंतर्मनाचा आत्मा आहे,
कवितेमध्ये भावार्थ आहे,
कविता जीवन जगण्याचा परमार्थ आहे.।।१।।
अंतर्मनातून उमटतात भाव,
अनुभवातून प्रगल्भ होतात विचार,
कल्पनेच्या जगतातुन,
उमटतात कवितेचा शुद्ध विचार.।।२।।
कवितेचा जन्म हृदयातून होतो,
जेव्हा विचारचक्रे फिरतात सर्वदूर,
माणिक मोती शोधून काढे,
कवितेच्या विचारधारेत वाहते सर्वदूर.।।३।।
जरी कवी जगतात नाही,
अजरामर आहे वाणीतील कविता,
कविता कधी मरत नाही,
जन्मानुजन्मे जिवंत राहते कविता.।।४।।
भावविश्वात भरकटतो कवी,
जेव्हा साहित्याची करतो निर्मिती,
तन मन दाही दिशा फिरवतो,
कंठातुन निघतात शब्द कवितेची करतो निर्मिती.।।५।।
कवितेकरिता विहार करावे,
डोंगरदऱ्या फिरुनी यावे,
खळखळणारे झरे न्याहाळावे,
कवितेचे शद्ब जोडत जावे.।।६।।