रोपटं
रोपटं
💐💐💐💐💐💐💐💐💐
बाग फुलवितो माळी,
रोज घालतो रोपट्याला पाणी,
त्याची निगा रोज राखतो,
जणू लेकरापरी करतो जपणी.।।१।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
दिवसागणिक वाढते रोपटं,
पानाफुलाने फूलतो,
मोहोर येतो फांद्या फांद्यांवर,
रसाळ फळाने झाड बहरतो.।।२।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
माणसाने शिकावं झाडापासून,
सावली फळे ऑक्सिजन देऊ करतो,
खोड बनून लाकूड बनतो,
शेवटी प्रेत जाळायला स्वतःला जळतो.।।३।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
बागबान हा जणू कर्ता पुरुष,
बाळांना फुलापानाप्रमाणे जपतो,
अंगाखांद्यावर बागडतात मुले,
जीवन जगताना सत्याचा मार्ग दाखवतो.।।४।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
हाल अपेष्टा सोसतात आईवडील,
अपेक्षा फक्त एकच असते,
वृद्धपकाळाची काठी
व्हावी,
अंगअंग थरथर कापते.।।५।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
हौस मौज पुरवल्या मुलांचे,
पोटाला चिमटा पीळ देऊन,
मुलांना फुलविले बगीच्या समान,
साऱ्या विश्वाच विष पचवून.।।६।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
कधी उडाली फुलपाखरे,
कळलेच नाही,
बाग फुलविली सोन्यासारखी,
कधी भुर्रकन उडाली उमजलेच नाही.।।७।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
शिकावे वृक्षवेली पासुन,
शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला जाळून घेते
कधी तक्रार नाही कोणाजवळ,
आयुष्यभर सावली देत राहते.।।८।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
सृष्टीचा हा नियम वेगळा,
माणसापेक्षा वृक्षाची जपवणूक करा,
जीव लावा सृष्टीला प्राणवायू चा जिवंत झरा,
स्वतःहा घेतो कार्बन वायू सोडतो प्राणवायू वारा.।।९।।
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳*