STORYMIRROR

सुरेश पवार

Inspirational

3  

सुरेश पवार

Inspirational

*आई तुजला वंदन

*आई तुजला वंदन

1 min
322

आई तुजला वंदन करतो,

नमन करू तुजला,

तूच माझी उद्धारकर्ती,

जग दाखविला मजला.।।१।।


पहिला माझा गुरू झाली,

शिकवले बोलायला,

ततफफ तोतरे बोल,

शिकवलेस मला चालायला.।।२।।


जगाच्या पाठीवर पाठवलेस मला,

तुझाच पाठी हात होता,

नाव कमावले विश्वात,

सारा आशिर्वाद माझा सोबती होता.।।३।।


आज उभा आहे मी जगासमोर,

तुझ्याच सामर्थ्याच्या हिम्मतीवर,

वेळे वेळी आधार असतो,

नाव कमावले तुझ्याच किंमतीवर.।।४।।


अनंत उपकार कसे फेडू,

आई तुझे उपकार आहे मजवर,

सात जन्म घेउनी तुज पोटी,

नाही फेडू शकणार ऋण आयुष्यभर.।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational