Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

सुरेश पवार

Inspirational

4.3  

सुरेश पवार

Inspirational

वाढत्या मागण्या

वाढत्या मागण्या

1 min
394


लग्न जुळवता नाकीनव येत,

लग्न जुळले तर अपेक्षाचा कहर,

लहानच मोठं करावं मुलीच्या जातीला,

काय करावं बापाने घ्यावा का जहर.।।१।।


माणुसकी संपत चालली,

बोलणी होते लग्नाच्या देण्याघेण्याची,

ठरतात सारे सामानाची यादी,

सारा सामान घरापर्यंत पोहोचवण्याची.।।२।।


पोटचा गोळा स्वाधीन करावे,

अजून कसला हो हा गाजावाजा,

पिळवणूक होते वधुपित्याची,

अजून किती वाजवणार बँडबाजा.।।३।।


हुंड्यासाठी मोडतात लग्न,

लग्नानंतर चालवतात छळ,

अमानुष वागणूक देता बहिणींना,

का करतात हा अघोरी छळ.।।४।।


कुठेतरी लगाम लागला पाहिजे,

विरोध करावे सारे मिळून,

लग्नाळूच्या वाढत्या अपेक्षा,

थांबवावे आपण सगळे मिळून.।।५।।


लग्नाळू नवरोबाच्या मागण्या फार,

वाढत्या मागणी ला विरोध करा,

देऊ नका अश्या नवरोबाला मुली,

अशांना अद्दल तर घडवा जरा.।।६।।


Rate this content
Log in