मधुर वाणी
मधुर वाणी
संस्कार हे घरापासून असते,
एका कडून दुसऱ्याकडे जाते,
मतापित्याने पेरले संस्कार,
जसे रोवले बीज तसेच उगवले जाते.।।१।।
मन प्रसन्न ठेवा घरभर,
संस्काराचे बीज पेरूया,
घरापासून दारापर्यंत,
संस्काररूपी महामेरू रोवूया.।।२।।
शिकवण ही जन्मजात असते,
नेहमी खरे बोलावे,
शिकवणी मिळते घरीदारी,
गुरुजनांचे आदर मानावे.।।३।।
संस्काराचा घेऊन विडा,
जिभेवरचा वाढवा गोडवा,
मधुर वाणीने मने फुलवा,
संस्काररूपी विकास घडवा.।।४।।
सारे विश्व संस्काररूपी करावे,
जन माणसात विचार पेरावे,
माधुर्याचा गुंफावी माळ,
सारे जग संस्कारमय करावे.।।५।।