STORYMIRROR

सुरेश पवार

Abstract

3  

सुरेश पवार

Abstract

आशेचा किरण

आशेचा किरण

1 min
238


आहे मनी आशेचा किरण,

नोकरी गेली पद गेले,

कोरोनाचा कहरामुळे,

सारे काही वाहून गेले....

अजून ध्यास नाही सोडले

जिद्द अन् चिकाटी अंगी

दुःखा बरोबर करीन दोन हात

विजय मिळविणार व्हायरस वर

नाही सोडला मी अजून श्वास

पुन्हा जगविन आशेचा किरण.....

पुन्हा नांदेल सारे जग

मनी बाळगूनी आत्मविश्वास

पुन्हा उजाडेल विजयी पहाट

करून साऱ्या दुःखावर मात

येईन पुन्हा संसारात नांदी

जेव्हा सुखकर होईल प्रवास .....

समुद्र किनारी थांबावे का जरा??

पहातच रहावे मावळत्या सूर्याला

पुन्हा पुन्हा सकाळ व्हावी

जणू पसरावी सुवर्ण किरणे....

घेऊन पाठीवर बोचके

निघालो होतो सुख शोधायला

जाऊन समुद्राच्या किनाऱ्यावर

सारे दुःख हरपुन बसला.....

जागा आणि जगु द्या

वाढवा गोडवा समाजात

पेरावे आशेचा किरण

विचार रुपी समजावू जरा

हेही दिवस निघून जातील

नव्या दमाने जगू जरा

पुन्हा येईल आशेचा किरण

हीच ठेवू विचारधारा


Rate this content
Log in