चांदण चकवा
चांदण चकवा


चांदण्यात नाहताना सावरले तू मला
कथा चांदण्याच्या ओठी तुझ्या
चांदण्यात नाहताना तप्त तनी तप्त मनी
चांदण्यात लिंपलेले चांद्रशिल्प मी तुझे
चांदण्यात नाहताना फुले चांदण्यांची
भाळावरचे माझ्या चंद्रबिंब ते तुझे
चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी
कायाभर दाट वाट मोगरा फुलला तुझा
चांदण्यात नाहताना मिठी चांदण्याची
गुदमरून गर्द श्वास सळसळत रुजला तुझा
चांदण्यात नाहताना भैरव ते भूपाळी
अणूरेणू आरक्त पित घनघन भिनला तुझा
चांदण्यात नाहताना दोन सावल्या सरो
जर्द निळे शीळ पीळ मदनमारवा तुझा