प्रबळ इच्छाशक्ती
प्रबळ इच्छाशक्ती


चला हरवूया कोरोनाला,
स्वच्छतेचे नियम पाळा,
एक मीटर चे अंतर ठेवा,
तोंडाला लावा मास्क चा जाळा.।।१।।
हात धुवा नेहमी साबणाने,
माझे कुटुंब माझी जबाबदारी,
सर्दी पडसे ताप दमा कफ असेल तर,
घ्या साऱ्या घरादाराची खबरदारी.।।२।।
आरोग्य कर्मचारी येतो दारोदारी,
माहिती द्या त्यांना हो खरी,
नका लपवू कोणत्याही आजाराला,
नाहीतर अंतिम यात्रा निघणार खरी.।।३।।
शासनाने दिलेले नियम पाळावे,
स्वतःचे तुम्ही व्हा रक्षणकर्ते,
सारे विश्वची माझे घर,
समाजाचे व्हा जाणते पुरस्कर्ते.।।४।।
महामारीने विळखा घेतला,
डॉक्टराच्या सल्ल्याने घ्या ट्रिटमेंट,
ईम्युनीटी पॉवर वाढवा,
नाही होणार तुम्ही रिटायरमेंट.।।५।।
पूर्णपणे बरा होतो आजार,
इच्छाशक्ती प्रबळ ठेवा,
कोरोनाला हरवण्याची,
पुर्णपणे वसा घ्यावा.।।६।।