STORYMIRROR

Vanita Shinde

Action

4  

Vanita Shinde

Action

भिमबाबा

भिमबाबा

1 min
27.3K


बाबा तुमचा तो संघर्ष

आम्ही कधी विसरणार नाही

समभावाची अन् एकतेची

कधी शिकवण मिटणार नाही.

दलितांच्या सुखापायी

तुम्ही केल्या खूप सोयी

राखीव हक्काची कमाई

तुमचीच ती होती लढाई..

बाबा तुमची ही पुण्याई 

आम्ही कधी विसरणार नाही

अस्पृश्यांच्या शिक्षणाची

केली जिद्दीनं पायाभरणी

दीन-दुबळ्यांवर मायेने

तुम्ही उभे छत्रछाया धरुनी..

बाबा तुमची ही वेडी माया

आम्ही कधी विसरणार नाही.

दिवसरात्र एक करुनी

तुम्ही भारतीय घटना लिहिली

घटनेचे शिल्पकार म्हणून

तुमची जगाने ओळख धरली

बाबा तुमची ती लेखनी

आम्ही कधी विसरणार नाही.

प्रज्ञा, शिल, करुणा

याची जाणीव सदैव उरली

किती गायली जीवन गाणी

नाही आठवण कधी हो सरली

बाबा तुमची ही जीवनगाथा

आम्ही कधी विसरणार नाही

तुमच्या शिकवणीचा ठेवा

आम्ही असाच जपणार आहे

खरा तुमचाच हा आदर्श

आम्ही मनात धरणार आहे

बाबा तोच सर्व जगाला

अभिमानाने सांगणार आहे

तुमच्या यशाच्या मार्गावरच

आम्ही वाटचाल करणार आहे

भीमबाबा या नावासाठी

सारे आयुष्य वेचणार आहे

बाबा तुमच्या नावाला

आम्ही कधी विसरणार नाही

तुमच्या संघर्षाचा अनमोल ठेवा

आम्ही पुढे चालवणार आहे

दीन-दलितांचे कैवारी तुम्ही

आमचे आयुष्य घडविले आहे

बाबा तुमचा हाच आदर्श 

आम्हा जीवन देणार आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action