STORYMIRROR

vanita shinde

Romance Inspirational Others

2  

vanita shinde

Romance Inspirational Others

चित्रकाव्य

चित्रकाव्य

1 min
51

नदीकिनारी बसले निवांत

एक जोडपे बाकावरती,

सुंदर हिरवा निसर्ग फुलला

संथ वाहत्या पाण्याभोवती


संध्याकाळी कातरवेळी 

सोबतीला शांत एकांत,

भाव मनीचे उलडगत

बसले दोघोही निवांत


अबोल मनाने पहात जल

दोघेही नकळत दुरावले,

ठेवूनी अतंर मौन बसूनी

स्वत: मध्येच ते हरवले


रमुन गेले गतकाळातील

आठवणीच्या हिंदोळ्यात,

झुलत राहिले काही क्षण

फुलणाऱ्या प्रित मळ्यात


नको हा दुरावा कधी नात्यात

सुख दु:खात रहावी साथ,

वचन द्यावे स्मरुन भास्करा

नाही सोडणार कधीही हात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance