STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
224

स्वातंत्र्याचा अर्थ कधी

नसतो फक्त स्वैराचार.

माणुसकीला जपणारे

असावे आपले सर्व आचार..


मानवतेच्या तत्वाखाली

जुळावी नाती जिव्हाळ्याची.

गुंफुन विश्वासाचा धागा

लाज राखावी स्वातंत्र्याची..


अरेरावी अन् पोकळ आव

हुकुमशाही कुरघोडी डाव.

भलत्याच वेड्या हट्टाचा

नको कधी मनात दुर्भाव..


उच्च-नीच, गरीब-श्रीमंत

नको जात-धर्म भेदभाव.

ना सान-थोर वा नर-नारी

समानतेचा असावा स्वभाव..


बळजबरी अन् क्रुरतेने

नको कुणावर अत्याचार

स्वकर्माचा न हो कुणा त्रास

हाच मनी असावा विचार..


स्वातंत्र्याच्या नावे नुसत्या

नकोत कत्तल, दंगली.

सर्व स्वातंत्र्यांना समजून

घडवू या संस्कृती चांगली..


दुजाभावाने हवा मनात

कशाला भावनांचा बाजार.

स्वातंत्र्याचा वसा घेऊनी

करू या जीवनाचा उद्धार..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational