Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

घे भरारी

घे भरारी

1 min
157


आहे मनात जिद्द तुझ्या

उंच अशी तू घे भरारी,

स्वप्नांना साकारण्यास

लढ तू ग बनून करारी


कष्ट करण्याची अपार

तुझ्यात आहे खुप जिद्द,

नको मानू हार आता

कर पार संकटांची हद्द


होतील बरेच घाव पण 

नको जुमानू तू गडे,

न डगमगता हसतच

सोसून सारे चाल पुढे


आकाशी घाल गवसणी

घे जिंकूनी सर्व सुखांना,

बंदिस्त भाव कर मोकळे

डावलून दे तू दु:खांना


खेचू पाहतील तुला मागे

करतील मार्ग तुझे बंद,

दाखव तुझी स्त्री शक्ती

अन् घे भरारी तू बेधुंद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational