स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
आहे जीवन अनमोल आपले
आपणच त्याचे करावे रक्षण,
नियम तोडून नका होऊ तुम्ही
कोणत्याही रोगाचेे भक्षण.
आली कितीही संकटे जरी
तमा नसावी मनी त्यांची,
तत्पर असावे सदैव आपण
ताकद ठेवावी लढण्याची.
केले स्वत:चे रक्षण प्रत्येकाने
तर सहजच होईल देश रक्षण,
आयुष्यात हे सत्कर्म करण्याचे
मनालाच आपण द्यावे वचन.
पाळून नियम संरक्षणाचे
लुटावा आनंद जगण्याचा,
सुरक्षा करून जीवनाची
दाखवा रुबाब वागण्याचा.
--------------------------------
