स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
मनी रेखाटते मी रोज
माझ्या स्वप्नांची रांगोळी,
तिला सजवू पाहते ग
रंग भरुनिया ओळी.
आले वादळ किती जरी
तरी नाही मानत मी हार,
गेली पुसून रांगोळी माझी
पुन्हा नव्याने लावते जोर.
जिद्द मनात आहे माझ्या
जीवन लढा हा लढण्याची,
सुख दु:खांच्या रंगानी छान
नक्षी मनमोहक काढण्याची.
उंच भरारीने देईन मी ग
माझ्या स्वप्नांना आरोळी
माणुसकीचे रंग भरुनी
सजवीन सुंदर रांगोळी.
-----------------------------