शब्दातून व्यक्त होताना
शब्दातून व्यक्त होताना
1 min
193
अबोल मनाला फुटे वाचा
शब्दांतून व्यक्त होताना,
दाटलेले भाव उफाळती
शब्द पानावर बोलताना.
शब्द सुमने उधळती जणू
मनाच्या कुपीतील सप्तरंग,
लेखणीतुन सहज उमटती
काळजात रुतलेले अंग.
व्यक्त व्हावे वाटते जेव्हा
अंतरातील त्या भावनांना,
मन मोकळे करण्यासाठी
मिळावी वाट या वेदनांना.
घुसमटलेले भाव जाती
स्पर्शूनी अबोला अलगद,
मुक्या वेदनेला अलवार
टिपून घेतो कोरा कागद.
असते तळमळ वेगळी
शब्दांतून व्यक्त होतांना,
अचूक ठाव घेत मनाचा
लेखणी वेचती शब्दांना
