STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

अंगणाची शान लेक माझी

अंगणाची शान लेक माझी

1 min
274

इवलासा जीव येता जन्माला

आनंद झाला माझ्या मनाला,

बहरुन गेले फुलूनिया मन

पाहताच क्षणी गोड लेकीला.


पोटी माझ्या घेवुनिया जन्म

जीवनास तिने दिला आकार,

तिच्या जन्मामुळे आयुष्यातील

स्वप्न एक माझे झाले साकार.


जणू उमलून आली एक कळी 

दरवळ तिचा वाटे फुलापरी,

घरपण आले तिच्या येण्यामुळे

लाभो तिला उंच यशाची भरारी.


भोळा स्वभाव निर्मळ मनाची

अंगणाची शान लेक माझी,

सर्वांची लाडकी आहे गुणाची

बापाचाही मान लेक माझी.


छान संस्कार तिला शिकवीन

देऊनिया सर्व शिक्षणाचे ज्ञान,

जपून माणुसकी जिंकेल मन

जगास वाटेल तिचा अभिमान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational