STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational Others

3  

Prashant Shinde

Inspirational Others

जिद्द...!

जिद्द...!

1 min
15K


केव्हातरी मी बाळा

म्हण गुरुजींकडून ऐकली होती

ती त्या बालवयात

मनावर ठसली होती...


तीच म्हण मी बाळा

घोकून घोकून पाठ केली

हृदयात ती कायमची

कोरून जिवंत ठेवली..


महापूरे झाडे जाती

तेथे लव्हाळे वाचती

प्रयत्नांती परमेश्वर

पंगू लन्घयते गिरीम...


असेच असते जीवनात

जमीन भेगाळली म्हणून काय झालं

उद्या उजाडणार हे आहेच

आणि धरणी माय दान

देणार हे पण आहेच...!


मग हताश कशा पायी व्हायचं ?

नको ते सपान कशा पायी पहायचं ?

अरं जन्म तर जगण्यासाठी असतो

तर तो मरून का संपवायचा ?


क्या खा तो दम खा म्हणून

आनंदात जीवन जगायचं

नियतीला सुद्धा गड्या

आपल्या जिद्दीन हरवायच...!


असं जमिनीकडं बघून

अश्रू नाही गाळायचं

जमीन आहे याचं

समाधान तरी नक्की मानायचं..!


तीच माय आपली लेकराला उपाशी

कधी तरी ठेवलं काय..?

नशीब उघडल्या बिगर

कधी राहील काय...?


उद्याचा दिवस भाग्यच घेऊन येणार

तुला हवं ते सारं ओट्यात घालणार

तू गड्या मोठ्या थाटात राहणार

जमीनदार म्हणून चौकात मिरवणार..!


सोड निराशा धर मनी आशा

बसुदे इतरांना मारत माशा

मर्द गडी तू बळीराजा

पीळ तुझ्या ओठावरच्या मिशा

ह्यांग अश्या....!!


जिद्द धरी रे जिद्दीसाठी

जिद्दी पोटी फळे रसाळ गोमटी

काढू नको उगाच चिमटी

बहुमोलाची रे तुझी जमीन गोमटी....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational