संतुलन..!
संतुलन..!
एकतीस डिसेंबर 2023...!
संतुलन...!
संतुलन किती मजेशीर
साधण्यास लागतो उशीर
नव्याचे नऊ दिवस म्हणतात
असत्य नसे प्रत्येकजण जाणतात...
नऊ दिव्यांची मांडणी पाहून
नवसंकल्पांची जाणीव झाली
पुन्हा म्हंटले वर्षाखेरीस
आठवण जुन्याच संकल्पांची आली...!
नव्याचे नऊ दिवस झाले होते
सारे संकल्प केंव्हाच विरले होते
पुन्हा सुरुवात म्हंटले करायची आहे
संकल्पना पुन्हा लाजवायचे आहे...!
संकल्प केला आज नवीन
नववर्षाच्या मुहूर्तावर संकल्प करू
तडीस न्हेण्याची शिकस्त करू
पुरते संकल्पना पुरून उरू..!
माघार नाही आता
थेट संकल्पना भिडायचे
मनोरथ पूर्ण करण्या झटायचे
संकल्प सारे तडीस न्ह्यायचे...!
संतुलन खरोखर साधायचे
माघारी नाही वळायचे
संकल्पा पासून दूर नाही पळायचे
संतुलनाचे नियम नक्की पाळायचे...!
बघू,पाहू, करू सारे सोडायचे
नवचैतन्याने नारळ फोडायचे
नाही ,नको, पुरते खोडायचे
नवं वर्षात यशाचे तिकीट फाडायचे...!