आला सान्ता(बडबडगीत)
आला सान्ता(बडबडगीत)
साऱ्यास म्हणतो चला खेळा.
आला आला सान्ता पळा पळा....।।ध्रु।।
लाल टोपी, सदरा आला घालून.
चाॅकलेट, खेळणी भेट घेऊन.
साऱ्या मित्रांचा जमतो मेळा.
आला आला सान्ता पळा पळा....।।१।।
माझ्या घरी आला वाजवत बेल,
नाच गाण्यात रमला, जिंगल बेल.
हॅपी ख्रिसमसचा खेळ रंगला,
आला आला सान्ता पळा पळा....।।२।।
नाताळची शुभेच्छा होता तो देत.
नाचलो सारेच मनसोक्त आनंद घेत,
खाऊ खाण्यास सारे झाले गोळा.
आला आला सान्ता पळा पळा....।।३।।
लपलय कोण त्यात अंदाज घेत.
नवीन वर्षात च्या शुभेच्छा देत.
जिंगल बेल गाण गातोय भोळा
आला आला सान्ता पळा पळा....।।४।।
वाट पाहतो आवडीने सान्ताची जेव्हा.
नाताळ सण येतो जेव्हा तेव्हा.
मित्रांचा आठवणीचा धमाल कल्ला
आलाआला सान्ता पळा पळा....।।५।।