पुर्वजांची आणशान
पुर्वजांची आणशान
सातबारा घरावर
नाग घुसले चिकार
लाच खाऊन महान
लढे अस्तित्वा झंकार
वावटळ चारी दिशा
नाही डगमगणार
कोडे सोडवीन कैफ
काटे खिळे टोचणार
सत्य मार्गाचा सुरंग
शब्द बाण झेलणार
पुर्वजांची आणशान
हार नाही मानणार
पाठीराखा सद्गुरू
पैलतीरी सोडणार
नको चिंता दिशाहीन
माणूसकी जिंकणार
जाळ स्वार्थी मुखवटे
दावा सत्कर्मा हिशोब
देई दुष्कर्मा शासन
देवा दाखव कसब
