चष्मा
चष्मा
मृगजाळ पायपीट
महामेरू कर्तृत्वाचा
मोह पाश नाती गोती
झुले हिंदोळा स्वप्नाचा
प्रेम भांडण संवाद
मृग कस्तुरी शोधत
मुक्त पैलतीर पीळ
स्थित्यंतर विहारत
स्मृती भंडार अंतरी
हृदयी कप्प्यात न्हाऊन
चक्र प्रहार वळण
जरी झुरत बंधन
चढ उतार वयात
साथ तुझी खोडकर
लपंडाव चष्मा खेळ
जगताचा चितचोर
निरागस स्नेहभाव
स्वर्गसुख भविष्याचा
मौन रूंदन सांत्वन
साथीदार निरोपाचा
श्रीमती संजना सुनिल कामत (मुंबई)
