Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

UMA PATIL

Classics


4  

UMA PATIL

Classics


महाराष्ट्र भूषण

महाराष्ट्र भूषण

1 min 4.9K 1 min 4.9K

तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा ।

चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥ १


स्वामींचे श्लोक मनाचे । होई कल्याण जनाचे ।

नको सोहळे तनाचे । तो रामदास सांगे ॥ २


द्यावे सर्वांनी वचन । परंपरेचे जतन ।

संत असती रतन | महाराष्ट्र भूषण ॥ ३


जगी हीच असे रीत । आपुलीच व्हावी जीत ।

सर्वांचे साधूया हीत । सकल मनुजांचे ॥ ४


विठ्ठलाची करू भक्ती । विठुराया देई शक्ती ।

विठुनामे मिळे मुक्ती । सर्व पशु-प्राण्यांना ॥ ५


नामस्मरणाची आस । कृष्णभक्ती माझी खास ।

चराचरांत सुवास । चंदन दरवळे ॥ ६


वारकरी चाले पायी। पांडुरंगाच्या रे ठायी ।

पुजूयात बैल, गायी । थोर परंपरेत ॥ ७


आहे महाराष्ट्र थोर । इथले हुशार पोर ।

प्रत्येकाच्या ठायी जोर । विजयी होण्यासाठी ॥ ८


राहिल तोचि रे सुखी । देव नाम ज्याच्या मुखी ।

नसेल कोणीही दुःखी । प्रार्थना करूयात ॥ ९


उजळती लक्ष ज्योती । गुंफू प्रीतीचिये मोती ।

जोडू प्रेमबंध नाती । एकमेकां साथीने ॥ १०


जयजयकार करू । जरी जिंकू किंवा हरू ।

राष्ट्रासाठी आम्ही मरू । हेचि 'उमा' म्हणते ॥ ११


Rate this content
Log in

More marathi poem from UMA PATIL

Similar marathi poem from Classics