तुज विण कोण...
तुज विण कोण...
अनेकदा बजावले मी
माझ्याच या पावलाना
नकोस भाळू मना तू
सांजेच्या काजव्यांना
अंत होता भावनेचा
मरण सुखात्न मागतो
जगण्यातील राम ही
अडगळीत सापडतो
जीव हा भ्रमर तरिही
जगण्यास गंध शोधतो
सुकलेल्या फुलास सोडी
कळीस भाव वाहतो
ठेविले तैसैची रहावे
अनंता चे वचन वदावे
तुज विन कोण माझे
प्रश्न मनीचे या विरावे..
याहून जगीच्याही अंती
नसे तुजसम मज सोबती
नीयतीची हाक येते कानी
पुढे तू उभा नित्य संगती
तुज विण कोण माझे ना
दैव भाव नशीब तू दाता
जगी यातनांचे ओझे वाही
हृदयी तुझ्या नामाची वही
गोठला अंधार या जीवनी
तुच वाटही दावि अनंता
जग जाहले परके मजला
तुज विण कोण माझे आता..
