"तू माझ्यासाठी"
"तू माझ्यासाठी"


नकळत जेव्हा हाताशल्या माझ्या मनाचा
फुटू लागला होता बांध भावनांचा...
तू होतास तिथेच सावरण्यास,
आवरण्यास मजला एखाद्या भक्कम बुरुजासारखा....
मी भिरभिरत होते जेव्हा,
दिशाहीन ,उद्विग्न मनाने..
तू दिलास हाथ ,भरलास आत्मविश्वास माझ्यात,
घेऊनी मजला तुझ्या आश्वस्थ पंखाखाली...
सैरभैर होऊनि धावत होते जेव्हा,
जळत्या निखाऱ्यांनी भरल्या वाटेवरती...
हळुवार घालूनी प्रेमाची फुंकर शांत केलेस तू,
त्या माझ्या जखमांच्या धगधगत्या तप्तभूमीला...
एका वादळी घटिकेला जेव्हा प्रयत्नपूर्वक,
करत होते मी गोळा, आयुष्याचा पालापाचोळा..
तुझ्या दाट मायेच्या छायेत, हृदयाशी कवटाळून..
तेव्हाही तू उभा दिसत होतास मला.. सावरण्यासाठी..
आजही जेव्हा, मी अडखळते, धडपडते,निराश होते...
तेव्हा पाहते तुला मी क्षणाक्षणाला.. उभा असतोस तू..
माझ्यासाठी भक्कम..आधारस्तंभासारखा...
वाट दाखवणाऱ्या ध्रुवताऱ्यासारखा..
जीवनभर साथ देणाऱ्या श्वासासारखा...