फक्त एक कटाक्ष पुरे
फक्त एक कटाक्ष पुरे
धनाची लालसा नाही, नसे मज हाव वित्ताची।
पुरे मजला झलक एका तिच्या प्रेमळ कटाक्षाची।।१।।
नदीकाठी कधी व्हावी अचानक भेट दृष्टीची।
लहर दोन्हीकडे उठते कशी अलगद प्रेमाची।।२।।
जणू बिजली धरेला भेटण्या साठीच कडकडते।
नजर माझी तिला बघण्या सदासाठीच धडपडते।।३।।
नयनचक्षू अधिर झाले सखीच्या दर्शनासाठी
यमाला यायचे येवो भले मग त्या क्षणापाठी।।४।।
सुखाचा सोहळा व्हावा तिच्या माझ्याच मिलनाचा।
जगाला दाखवा असतो कसा आनंद प्रेमाचा।।५।।
मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची।
मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची।।६।।