STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

4  

Sakharam Aachrekar

Others

मन माझे गुंतले...

मन माझे गुंतले...

1 min
2.7K

इंद्रधनुच्या अंतरंगी, आनंदाचे घन बरसले

गुलबक्षीच्या रम्य हृदयी, मन माझे गुंतले... 


धरणीवर सांडणार्‍या जलबिंदूंशी, मैत्री करणारा उनाड वारा

उठवू पाहतोय ओल्या अंगावर, प्रितीचा शहारा

सुवर्णचाफा उजळवे, गंध मृदेचा जणू असा

उनाड भ्रमर करी गुंजन, राग बागेश्री गाई जसा

संपन्न अशा त्या कातरसमयी, भाव अन्य हरपले

सुगंधित रातराणीसवे, मन माझे गुंतले... 


रम्य पहाट शीत दवबिंदू, चांद रातीचा निमाला

ढगाआडूनी फिरता फिरता, सागरभूशी मिळाला

कवेत घेऊनी जीवनाच्या, लक्ष लक्ष आठवणी 

निघालो पुन्हा समीप, विनाशाच्या क्षणोक्षणी 

कृष्णधवल त्या आठवणींनी, सप्तसागर गंधले

आठवणींच्या क्षीरसागरी, मग मन माझे गुंतले...


Rate this content
Log in