STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

तुला पाहताना

तुला पाहताना

1 min
339

मला आस की काळ मागे पडावा, तुला पाहताना 

असे वाटते जन्म सारा सरावा, तुला पाहताना 


किती प्रीत आहे मनी आज माझ्या, कसे काय सांगू 

प्रिये भाव माझा तुलाही कळावा, तुला पाहताना


जरा दाविता हास्यमुद्रा फुलावी, फुले कोवळी अन् 

शशी या नभी चांदणे देत जावा, तुला पाहताना


अता हेच वाटे तुझा जाहलो मी, तनाने मनाने 

मना अन्य या भास काही नसावा, तुला पाहताना


कसे रूप हे साजिरे अन, किती राहते कैफ ओठी 

प्रिये ईशही भान हरखून गावा, तुला पाहताना


पुन्हा जागवू प्रीतस्वप्ने खुळी, सागराच्या किनारी 

तिथे प्राण माझा पुन्हा लुब्ध व्हावा, तुला पाहताना

 

वनी नादणाऱ्या रुपेरी सुरांचा, सखे शोध घे तू 

इथे वाजवी 'हर्ष' मंजूळ पावा, तुला पाहताना 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance