STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

तुलाच आठवायचे

तुलाच आठवायचे

1 min
296

मनातल्या मनात मी तुलाच आठवायचे

तुझेच भास अंतरी उगीच साठवायचे


कधीतरी पुन्हा इथेच भेटशील तू मला 

उरात आस घेऊनी पुन्हा पुन्हा फसायचे


सुरेख नेत्र हे तुझे जयांत जन्म घेउनी 

कपोल गोड हे तुझे जिथे मला थिजायचे


अखेरचीच भेट ही अखेरचाच अलविदा 

अखेरचे तुझ्यापरी, मनात मी रडायचे 


नकोय रोजरोजचा असह्य त्रास हा मला

अता मला प्रिये तुझ्या मनात दरवळायचे


अशीच जा पुढे तुला सुखे मिळो क्षणोक्षणी 

तुला सुखांत पाहुनी नेत्र मी मिटायचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy