STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

2  

Sakharam Aachrekar

Romance

ती बोलून जाते काही

ती बोलून जाते काही

1 min
59

जाता जाता अवचित मज ती बोलून जाते काही

अर्थ लावता त्या शब्दांचे रात्र उलटून जाई


भेटीच्या रंगांत आपल्या, सांज उतरूनी येते

 रात्र निळी ही गुपित आपले पोटी दडवुन घेते

वाऱ्याशी मग करून मैत्री आम्ही चालत असतो

निघायचे संकेत द्यावया शुक्र अनामिक दिसतो 

पाठी वळुनी करून इशारे उगीच काहीबाही

जाता जाता अवचित मज ती बोलून जाते काही


दिशाभान लागते कुणाला प्रीत सवे असताना

शब्द आपसूक मेळ घेती, गीत तिचे लिहिताना

क्षुधा तृषा हे गौण चिरंजिव पहिली असते प्रीती

जगायला सांगते नव्याने सोडून जुनाट रिती

जगणे म्हणजे केवळ प्रीती दुसरे काही नाही

जाता जाता अवचित मज ती बोलून जाते काही


आठवणींची धार बरसली सचैल न्हाउन गेलो

सोबत झाली प्रीत तुझी अन पुरता वाहून गेलो

अंतर श्वासामधले अपुल्या आता मिटले होते

दोन तनू अन एक हृदय मज सारे पटले होते

पुन्हा भेटणे पुन्हा पेटणे असेच चालू राही

जाता जाता अवचित मज ती बोलून जाते काही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance