खूप मीही नवस केले-- गझल
खूप मीही नवस केले-- गझल
खूप मीही नवस केले देव ना मज पावतो
आस वेडी भाव वेडा मग भयाने पूजतो...
चोर तो का साव आहे ओळखू त्याला कसा
आरसा बघताच मी मज चेहरा जो दावतो...
सारवासारव तुझी त्या चालते पदरासवे
हेतु डोळयांना समजता उघडझापी टाळतो.. .
फूल हाती मज दिलेे हे आज प्रेमाने तिने
निर्दयी काटा हळू का मज हसूनी टोचतो.. .
पीठ जातींचे दळूनी काढले जात्यातुनी
पण पिठाला जात कुठली प्रश्न आता त्रासतो .
माज मस्ती आणि गुर्मी यात मुरलेला गडी
राख पण ठरल्या ठिकाणी व्हायची का विसरतो..
.

