जगणे तुझ्याचसाठी
जगणे तुझ्याचसाठी




आकाशातले तारे
आणि पुनवेचा चंद्र
जमणार नाही मला
तोडणे तुझ्यासाठी
गुलबकावलीचे फूल
सात समुद्रापलीकडून
जमणार नाही मला
खुडणे तुझ्यासाठी
चमचमणारे हिरे
कोळशाच्या खाणीतून
जमणार नाही मला
आणणे तुझ्यासाठी
सात जन्म तू माझ्या
सोबत असणार म्हणून
जमणार नक्की मला
जगणे तुझ्याचसाठी !