Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

विजयकुमार देशपांडे

Inspirational


3  

विजयकुमार देशपांडे

Inspirational


शिवबा, पुन्हा पुन्हा तुम्ही

शिवबा, पुन्हा पुन्हा तुम्ही

1 min 152 1 min 152

शिवबा, पुन्हा पुन्हा तुम्ही 

जन्म महाराष्ट्रातच घ्यावा  

"जय भवानी, जय शिवाजी" 

जीव या जयघोषात रमावा 


कर्तव्याची जाणीव ठेवत

हक्कासाठी धडपड करू  

ध्येय जीवनी बाळगू आम्ही

बडबड कमी, कृतीत उतरू  


एकीचे बळ सर्व जाणुनी

होऊ आम्ही सर्व आनंदी 

परोपकारी होऊ आम्ही

टाळू स्वार्थ साधण्याची संधी  


शिवबा, जन्म घेतला ही

आहे अजून पवित्र माती

राजे, पुन्हा अमुच्या नशिबी

व्हावे तुम्हीच छत्रपती  


शिवबा, तुम्हासाठी मरणारे

पुन्हा जन्मतील इथे मावळे

संधीसाधू लुच्चे फितूर लबाड

मरतील सगळे डोमकावळे 


नावाचा जयघोष तुमच्या 

चालू असतो सांजसकाळी

तुमच्या नावाची या भूमीवर 

गर्जत असते नित्य आरोळी 


म्हणवून घेतो आम्ही स्वत:स

अभिमानाने तुमचे अनुयायी

संकट अडचण दूर सारण्या 

जीवनी करतो रोज लढाई


हद्दपार केले शत्रूला 

कधीच आमच्या मनातुनी

"आमचे शिवबा" म्हणत जगतो 

आम्ही मनमानी दूर सारुनी  


वेगवेगळे सण, जयंत्या- 

वाजे डौलात इथे नगारा 

तुतारीत फुंकून प्राण  

जमतो जमाव उत्साही सारा 


धडपडताना दिसतो जो तो 

मिरवत भगवा हाती न्यारा 

शिवबा, स्वीकारावा आमचा 

मनापासुनी मानाचा मुजरा


Rate this content
Log in

More marathi poem from विजयकुमार देशपांडे

Similar marathi poem from Inspirational