STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Tragedy

3  

विजयकुमार देशपांडे

Tragedy

त्या वळणावर -

त्या वळणावर -

1 min
283

आठवतो मी आजही घेतलेले तू अचानक

होकाराचे नकार वळण त्या वळणावर ..

 

भेटत होतो दोघे कितीकदा आपण

वेळेवरती नियमित त्या वळणावर ..

 

गारव्यातली ऊब उन्हाळ्यातला गारवा

पावसातली चिंब मिठी त्या वळणावर ..

 

वचने आणाभाका आठवतात अजूनही 

विसावलेल्या त्या वळणावर ..

 

काय अचानक घडले नशीब माझे रडले

होकाराचा मिळता नकार त्या वळणावर .. !


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy