गझल
गझल
1 min
202
गुलाब हाती झेलले जरा होते मी
टोचुन काटे घेतले जरा होते मी
विजयी ठरलो झुंज देत मी मरणाशी
डाव यमाशी खेळले जरा होते मी
टाळत होतो सावलीसवे उन्हास ज्या
पायदळीही ठेचले जरा होते मी
रडलो होतो सुखातही मी कधीतरी
दु:ख हासुनी पेलले जरा होते मी
जीवन माझे रिक्त शिंपले जे आता
सुरेख मोती वेचले जरा होते मी...